येडियुरप्पा सरकारला दिलासा

October 29, 2010 9:49 AM0 commentsViews: 7

29 ऑक्टोबर

येडियुरप्पा सरकारला आता कोर्टाकडूनही जीवनदान मिळाले आहे. 11 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय योग्य असल्याचे, कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे.

काही दिवसांअगोदर कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारच्या विरोधात काही भाजप आणि अपक्ष आमदारांनी बंड पुकारले होते.

तेव्हा विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी , कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी, 11 आमदारांना निलंबित केले होते

आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या विश्वास मत प्रस्तावात येडियुरप्पा सरकार तरले होते.

पण त्यानंतर निलंबित आमदारांनी कोर्टात धाव घेतली होती.

आज दिलेल्या कोर्टात्या निर्णयामुळे येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे.

close