मनसे बनली किंगमेकर!

November 1, 2010 10:02 AM0 commentsViews: 104

1 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या इंजिनाने युतीचा सत्तेचा मार्ग रोखला आहे.

कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 31 जागांसह शिवसेना क्रमांकावर एक वर आहे.

तर 27 जागा मिळवत मनसेने दुसर्‍या क्रमांक पटकावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 14 जागा मिळवल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत.

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, युतीला 40 तर आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे 27 जागा जिंकणारी मनसे किंग मेकर ठरली आहे.

close