सहारा इंडिया स्पोर्ट्स पुरस्कार सोहळा संपन्न

October 31, 2010 1:39 PM0 commentsViews:

31 ऑक्टोबर

मुंबईत रविवारी सहारा इंडिया स्पोर्ट्स पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

कॉमनवेल्थ स्पर्धांनंतर लगेच झालेल्या या सोहळ्याला क्रिकेटर्सबरोबरच कॉमनवेल्थचे हीरोही या सोहळ्याची शान होते.

यावेळी सचिन तेंडूलकरला सवैर्त्तम क्रिकेटरचा मान मिळाला. तर या पुरस्कारांमध्ये कॉमनवेल्थवर विशेष विभाग होता.

आणि यात पुरुष ऍथलीट्समध्ये सर्वोत्तम ठरला तो चार गोल्ड पटकावणारा नेमबाज गगन नारंग आणि महिलांमध्ये तिरंदाज दिपीका कुमारीने बाजी मारली.

विश्वनाथन आनंदने चेसमध्ये विश्वविजेतेपद कायम राखले. वर्षातली सगळ्यात यादगार कामगिरी म्हणून आनंदचा गौरव करण्यात आला.

तर क्रिकेटमध्ये अर्थातच सर्वोत्तम क्रिकेटर ठरला सचिन तेंडुलकर आणि महिलांमध्ये मिताली राज सर्वोत्तम ठरली

close