मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यावर 2 नोव्हेंबरनंतर निर्णय

October 31, 2010 3:14 PM0 commentsViews: 8

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आपला राजीनामा सोनिया गांधीकडे दिला होता.

दरम्यान मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्या-संदर्भात 2 नोव्हेंबरनंतरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

2 नोव्हेंबरला काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट मिळावी, यासाठी राज्यातले अनेक नेते प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्र्यांची गटदेखील दिल्लीत तळ ठोकून आहे.

उद्या सकाळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि इतर नेते दिल्लीत जाणार आहेत.

सोनिया गांधी भेटीसाठी कुणाला वेळ देतात, याकडे काँग्रेसच्या नेत्याचे लक्ष लागले आहे.

close