‘आदर्श’बाबत टोलवाटोलवी

November 2, 2010 12:10 PM0 commentsViews: 2

02 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचा दावा खोटा ठरला आहे. आदर्श सोसायटीला पर्यावरणाची मंजुरी मिळाली. त्यावेळी शिवसेनेचे सुरेश प्रभू केंद्रात पर्यावरण मंत्री होते, असं काँग्रेसने म्हटले होते.

पण त्यावेळी सुरेश प्रभू नव्हे तर युपीएचा घटक पक्ष असलेल्या द्रमुकचे टी. आर. बालू पर्यावरण मंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरेश प्रभूंनी आयबीएन-नेटवर्कशी बोलताना हे स्पष्ट केले. 2004 मध्ये आदर्श सोसायटीत आपल्याला फ्लॅट मिळाला.पण त्यासाठी आपण बँकेकडून कर्ज काढलं होतं आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली होती, असे ही त्यांनी सांगितले.

तसेच ही सोसायटी कारगिल युद्धातल्या शहिदांसाठी होती, याचीही आपल्याला माहिती नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

…तर गांभीर्याने विचार करु – शरद पवार

आदर्श सोसायटी संदर्भातली जमीन जर लष्कराची असेल तर या घोटाळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस गांभिर्याने विचार करेल.

जर ही जमीन राज्य शासनाची असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांना जागा देण्याचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने मुख्यमंत्री बदलला तरी राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले आहे.

'आदर्श' घोटाळयाला मंजुरी यूतीच्या कार्यकाळात

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात भाजप आणि शिवसेनाही गुंतली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी केला आहे. त्यांच्याच काळात या सोसायटीला पहिली मंजुरी मिळाली होती, असंही ते म्हणाले आहे.

मुख्यमंत्री हवा स्वच्छ चारित्र्याचा – मेधा पाटकर

अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी पक्षाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.

यांच्यानंतर राज्याला मिळणारा नवा मुख्यमंत्री हा स्वच्छ चारित्र्याचा हवा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

आदर्श सोसायटीत भाजपची धडक

आज आदर्श सोसायटीत भाजपचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये घुसत असताना मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

जवळपास 350 ते 400 कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता.

बेस्टची कारवाई लवकरच

वादग्रस्त आदर्श सोसायटीची वीज बेस्टतर्फे आज तोडली जाणार आहे. काहीवेळातच ही कारवाई होणार आहे.

close