‘आदर्श’वरुन दोषारोप सुरु

October 31, 2010 3:29 PM0 commentsViews:

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आपला राजीनामा सोनिया गांधीकडे दिला होता.

या घोटाळ्यावरून आता दोषारोप सुरू झाले आहे.शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी आपण केवळ महसूलमंत्री होतो, आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे पालन केले, असा युक्तिवाद त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चव्हाणांच्या या आरोपांवर विलासराव देशमुखांनी प्रत्युत्तर दिल आहे. 'मी फक्त 20 सदस्यांसाठीच लेटर ऑफ इंटेट दिल होते.

त्याचा अर्थ मंजुरी असा होत नाही. मंजुरी महसूलमंत्र्यांनीच म्हणजेच अशोक चव्हाणांनी दिली होती.

मला विनाकरण बदनाम करण्यात येत आहे असे 'आयबीएन-नेटवर्कशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

close