महापौरपदावरुन रस्सीखेच

November 2, 2010 12:43 PM0 commentsViews: 20

02 नोव्हेंबर

कल्याण – डोंबिवलीमध्ये महापौर कोणाचा यावर आता महाभारत सुरू झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेपुढे सगळे पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे.

तर मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी मात्र मनसे शिवसेनेबरोबर जायला तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अंबरनाथ पॅटर्न हा आता शिवसेना सोयीसाठी वापरत असल्याची टीका त्यांनी केली.

आमच्या प्राईम टाईमच्या कल्याण-डोंबिवलीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत 31 जागा जिंकणारी शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपच्या नऊ जागांसह त्यांना सत्तेत येण्यासाठी अजून 14 जागांची गरज आहे.

त्याकरता कुणाशीही हातमिळवणी करु, अस शिवसेनेने म्हटले आहे. तसेच पुणे पॅटर्नची तयारी त्यांच्याकडून बोलून दाखवली जात आहे.

प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विधानावर मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी चांगलाच हल्ला चढवला. शिवसेनेनं अशाप्रकारे दुटप्पीपणा करण आता सोडावे, असंही ते म्हणाले.

महापौरपदात रस नाही – पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपल्याला महापौरपदात रस नाही असं सांगत पुणे पॅटर्नच्या चर्चेलाच ब्रेक लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात कडोंमपामध्ये 14 जागा आहेत आणि युतीकडे 40 जागा आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर ते बहुमताचा आकडा गाठू शकतात, आपली कोणाहीबरोबर जाण्याची तयारी आहे.

असं शिवसेना म्हणत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस सध्यातरी युतीला साथ देणार नाही अस दिसत आहे.

close