दिल्लीत मुंबई घटनाक्रमावर काँग्रेस कमिटीची बैठक झाली

October 29, 2008 4:27 PM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर,दिल्ली-दिल्लीत संध्याकाळी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मुंबईत होत असलेल्या उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रात परप्रांतीयांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप यावेळी केला गेला. कुर्ला इथं घडलेलं एनकाऊंटर.त्यात राहुल राज या बिहारी तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात झालेला मृत्यू. खोपोली इथं लोकल ट्रेनमधून एका परप्रांतीय तरुणाला झालेली मारहाण. या घटनांचा हवाला दिला गेला. या सगळ्या घटनांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.

close