आदर्श सोसायटीचे ऑक्युपेशन सर्टिफिकेट रद्द

October 31, 2010 3:00 PM0 commentsViews: 6

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केवळ राजकारणीच नाहीत तर सोसायटीही अडचणीत आली आहे.

एम.एम.आर.डी.एनं या 31 मजली इमारतीला दिलेले ऑक्युपेशन सर्टिफिकेट रद्द केले.

याचा अर्थ सोसायटीतल्या कोणत्याही सदस्याला आपल्या फ्लॅटचा ताबा घेता येणार नाही.

बेस्टनंही आदर्श सोसायटीला नोटीस बजावली आहे. आणि सोसायटीचा वीजपुरवठा का बंद करू नये, याची विचारणा केली आहे.

त्यासाठी सोसायटीला 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेनंही सोसायटीचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचा विचार सुरू केला आहे.

close