रडारवर 3 माजी मुख्यमंत्री

October 31, 2010 4:30 PM0 commentsViews: 6

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे.

मुख्यंमत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्राचे माजी तीन मुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्यात सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे.

आदर्श सोसायटीला अंतिम परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री आणि तत्कलीन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी दिली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन मंत्र्यांची नावंही आता या घोटाळ्यात पुढे आली आहेत.

राष्ट्रवादीचे अजित पवार, अनिल देशमुख आणि आर आर पाटील यांनी आपल्या नातेवाईकांना आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळण्यासाठी शिफारस केल्याचे उघड झाले आहे.

कोणा कोणाच्या नावाची शिफारस

1) अशोक चव्हाण, मुख्यमंत्री- सासूबाई दिवंगत भगवती शर्मा, मेव्हणी सीमा विनोद शर्मा आणि मेव्हणा जगदीश शर्मा यांची केली शिफारस

2) विलासराव देशमुख- मुख्यमंत्री असताना पर्यावरण आणि इतर गोष्टींची दिली मंजुरी- उत्तम घाकरे, किरण भंडगे आणि अमोल करभाणींच्या नावांची शिफारस

3) नारायण राणे- 1999 ला मुख्यमंत्री असताना याप्रकरणात लक्ष घालण्याचे दिले आदेश- पण नंतर त्यांनीही गिरीश मेहता आणि रुपाली रावराणेंच्या नावांची शिफारस केली.

4) सुशिलकुमार शिंदे- मुख्यमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श'च्या आराखड्याला त्यांनी अंतिम मंजुरी दिली- मेजर खानकोजे यांची शिफारस त्यांनी केली.

4) शिवाजीराव निलंगेकर- महसूलमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श'च्या जागेची परवानगी दिली- संपत खिडसे आणि अरुण ढवळे यांची त्यांनी शिफारस

5) अजित पवार, जलसंपदा मंत्री- कृष्णा भेगडे आणि शिवाजीराव कधे यांची शिफारस

6) गृहमंत्री, आर. आर. पाटील, – चंद्रशेखर गायकवाड यांची शिफारस केली

7) पतंगराव कदम, वनमंत्री- बाळासाहेब सावंत यांची शिफारस

8) अनिल देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- मुकुंदराव मानकर यांची शिफारस

close