सोनियांनी भ्रष्टाचाराचे विषय टाळले

November 2, 2010 1:03 PM0 commentsViews: 1

02 नोव्हेंबर

दरम्यान आज काँग्रेसच्या 125 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आज दिल्लीत सुरुवात झाली. या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी मात्र आदर्शसह सर्वच वादग्रस्त विषयांना बगल दिली.

काँग्रेसच्यानेत्यांनी काम करताना साधेपणा, संयम आणि पक्षावर निष्ठा ठेवावी असा सल्ला सोनिया गांधींनी पक्षातल्या नेत्यांना दिला आहे. काम करताना पक्षाची तत्व आणि सामान्य कार्यकर्त्यांना विसरू नका असंही त्यांनी सर्वांना सुनावले आहे.

आघाडीचे राजकारण करताना मित्र पक्षाचा आदर ठेवा पण पक्षाची ताकद वाढवण्याकडंही लक्ष द्या, अशा कानपिचक्याही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या आहे.

शिवाय पक्षात काम करताना प्रत्येकाचे समाधान होऊ शकत नाही, त्यांनी नाराज न होता काम करावे. मी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अस आश्वासन सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना दिले आहे. काँग्रेस अधिवेशनाच्या समारोप भाषणात त्या बोलत होत्या.

close