निकालावर लागला पावणेतीनशे कोटींचा सट्टा

November 1, 2010 5:21 AM0 commentsViews: 8

01 नोव्हेंबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निकालावर बुकीजचही बारीक लक्ष आहे. कल्याण-डोंबिवलीवर तब्बल पावणे तीनशे कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे.

सट्टेबाजांनी आपली पहिली पसंती दिली ती मनसेला. युती दुसर्‍या क्रमांकवर तर तीसरी पसंती आघाडीला दिली आहे.

जवळपास पंधरा वर्षांपासून सेनेकडे कल्याण-डोंबिवलीची सत्ता आहे.त्यामुळे ऍन्टी इनकंम्बसीमुळे मनसेच्या बाजूने कौल असेल असे सट्टेबाजांना वाटत आहे.

त्यामुळे मनसेला 10 पैशांचा भाव आहे.तर युतीला 45 पैशांचा भाव देण्यात आला आहे.

close