नवा प्रदेशाध्यक्ष कोण ?

November 3, 2010 8:31 AM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

महाराष्ट्र आणि मुंबईच्या कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांची नावं आज पर्यंत जी गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती ती नावं आज जाहीर होणार आहे. याबरोबरच माणिकराव ठाकरेंच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे गेली काही दिवस अनेक नेते दिल्लीमध्ये लॉबिंग करत होते.

वर्धा रॅली प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांचा पाठींबा असलेले माणिकराव ठाकरे यांचं नाव आता मागे पडले आहे. विलासराव देशमुख यांनी आपल्या गटाचा प्रदेशाध्यक्ष व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

मुंबईच्या अध्यक्षपदासाठीसुद्धा जोरदार चुरस आहे. कारण कृपाशंकर सिंग यांना पुन्हा हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे.

close