आदर्श : पर्यावरणाचे नियम धाब्यावर

November 3, 2010 2:34 PM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीने पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचे आता उघड झाले आहे. आदर्श सोसायटीने पर्यावरण विषयक परवानगीसाठी राज्य सरकारकडे अर्जच केला नसल्याचे राज्य पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

नुकतीच यासंदर्भात मंत्रालयात पर्यावरण सचिवांची बैठक झाली. या बैठकीला नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव, उद्योग खात्याचे प्रधान सचिव, मत्स्य विभागाचे संचालक उपस्थित होते.

त्यामुळे हे प्रकरण पुढील कारवाईसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारनंतर यासंदर्भातला अंतिम रिपोर्ट दिल्लीला पाठवला जाणार आहे.

ही जागा सी.आर.झेड 2 मध्ये येत असून या प्रकल्पाचा खर्च 5 कोटींपेक्षा मोठा असल्याने त्याला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. पण अशी परवानगीच घेतली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

close