तंत्रनिकेतन संस्थांना स्कोडाची फाबिया कार भेट

November 3, 2010 3:53 PM0 commentsViews: 7

03 नोव्हेंबर

दिवाळी म्हटल की भेटवस्तुंचाही सण. दिवाळीला गिफ्ट देण्याची पध्दत आहे. औरंगाबादच्या स्कोडा कंपनीने दिवाळीची एक आगळीवेगळी भेट दिली आहे.

जिल्ह्यातील पाच तंत्रनिकेतन संस्थांना स्कोडाची फाबिया कार भेट दिली. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी दिलेली ही भेट खर्‍या अर्थाने अर्थसंपन्नता व्यक्त करणारी ठरली.

स्कोडा कंपनीत अत्यंत साधेपणाने या पाच फोबिया कार आयटीआय संस्थांना भेट देण्यात आल्या आहे. स्कोडा कंपनीत आयटीआयमधून शिकलेले अनेक कर्मचारी काम करतात.

पण आधुनिक तंत्रज्ञानाची त्यांना ओळख नसते. म्हणूनच या कार संशोधनासाठी म्हणून देण्यात आल्या आहे. औद्योगिक क्षेत्रात अशाप्रकारे भेट देऊन आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच घटना आहे.

या कार्यक्रमाला स्कोडाचे कार्यकारी संचालक डॉ. ऑलिव्हर ग्रुहनबर्ग, संचालक मकरंद देशपांडे आणि आयटीआयचे प्राचार्य उपस्थित होते.

close