पणत्यांनी उजळला शनिवारवाडा

November 3, 2010 3:54 PM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

दिवाळीचा पहिला दिवस पुणेकरांसाठी खास असतो, कारण पुण्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा शनिवारवाडा आजच्या दिवशी हजारो दिव्यांनी उजळून निघतो.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसेला शनिवारवाड्यावर दीपोत्सव साजरा केला जातो.

पेशव्यांच्या काळात दिवे लावण्याची ही प्रथा होती. त्यानंतर काही काळानं ही प्रथा बंद पडली.

पण चैतन्य हास्य क्लबने पुन्हा एकदा ही परंपरा सुरू केली. आज हजारो पणत्यांनी शनिवारवाडा उजळून निघाला.

close