आदर्श सोसायटीला पर्यावरणाची मंजुरी नाही

November 3, 2010 10:05 AM0 commentsViews: 8

03 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीच्या इमारतीला पर्यावरणाची मंजुरी नाही हे केद्रीय पर्यावरण मंत्रालायाने स्पष्ट केले आहे. तरीसुध्दा याबाबत राज्य सरकार कडून पर्यावरण मंजुरी तसचे सीआरझेड मंजुरीबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.

गेल्या 29 ऑक्टोबरला राज्य सरकरान अंतरीम अहवाल सादर केला आहे. तर उद्या अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यासाठी आज पर्यावरण विभागाने सचिव स्तरावर बैठक बोलावली आहे.

या बैठकीमध्ये अंतिम अहवालावर चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नौदलाचा नकार

आदर्श सोसायटीकरता ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा भारतीय नौदलानं नकार दिला आहे. आज या संबधी नौदल अंतिम अहवाल सादर करणार आहे.

हा अहवाल खातेनिहाय चौकशी अहवालाच्या आधारे तयार करण्यात येणार असल्याची माहिती नौदलाने दिली आहे.

close