सोन्या-चांदीच्या खास नोटा

November 3, 2010 10:22 AM0 commentsViews: 15

03 नोव्हेंबर

दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनासाठी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. या पूजेमध्ये आपण चलनात असलेल्या नोटा किंवा नाणी वापरतो.

पण पिंपरी-चिंचवड इथल्या रांका ज्वेलर्संनी या दिवाळीत ग्राहकासाठी हीच पूजा करण्यासाठी सोन्याच्या आणि चांदीच्या नोटा तयार केल्या आहेत.

या चांदीच्या नोटावर विविध देवी-देवतांची चित्रं कोरण्यात आलेली आहेत. त्याच बरोबर काही नव्या डिझाईनची चांदीची नाणीही या दुकानात पाहायला मिळतात.

आणि या दुकानाचे खास आकर्षण म्हणजे सोन्याची नोट. या नोटा आपण कोणाला गिफ्ट म्हणूनही देऊ शकतो. किंवा घरी पूजेसाठीही वापरु शकतो.

ग्राहकांना आकर्षक दागीने देण्यासाठी रांका ज्वेलर्स दरवषी नव-नवीन कल्पना बाजारात आणतात. त्यांच्या या वर्षीच्या कल्पनेलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

close