ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवलाअखिलाडूपणा

October 29, 2008 5:08 PM0 commentsViews: 4

29 ऑक्टोबर,दिल्ली-ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मैदानावरील अखिलाडू वृत्तीचं दर्शन पुन्हा एकदा पाहिला मिळालं. यावेळी त्यांचं टार्गेट होतं गौतम गंभीर.दिल्ली टेस्टच्या पहिल्याच दिवशी गंभीरनं 149 रन्सची तुफान खेळी करत ऑस्ट्रेलियन बॉलर्सना आपल्या बॅटचा चांगलाच दणका दिला. गंभीर आऊट होत नसल्याचं पाहून ऑस्ट्रेलियन बॉलर्स चांगलेच बिथरले. मग त्याला डिवचण्याचा प्रकार सुरू झाला. याची सुरुवात केली शेन वॉटसननं. दुस•या रन्ससाठी धावणा•या गंभीरला वॉटसननं जाणूनबुजून अडवण्याचा प्रयत्न केला. आणि याला गंभीरनंही चांगलंच उत्तर दिलं. पण हा प्रकार इथंच थांबला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर सायमंड कॅटिचनंही गंभीरला काहीसा असाच त्रास देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर गंभीर आणि कॅटिचमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. पण अंपायर बिली बॉडन, व्हि. व्हि. एस्. लक्ष्मण आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटिंगनं वेळीच हस्तक्षेप करत हे प्रकरण थांबवलं. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचं शाब्दिक युध्द अजूनही संपलेलं नाही हेच यावरून पुन्हा एकदा समोर आलंय.

close