घर खरेदी होणार महाग

November 3, 2010 11:18 AM0 commentsViews: 17

03 नोव्हेंबर

दिवाळीच्या मुहुर्तावर घर खरेदी करणे आता महाग होणार आहे. कारण महागाई कमी करण्यासाठी क्रेडिट पॉलिसीमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे येत्या काळात होम लोन महाग होणार आहे.

महागाईला काबूत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेनं टिजर होमलोन काढून टाकण्याचे संकेत दिले आहे. रिझर्व्ह बँकेने गृहकर्जावरील प्रोव्हिजन शून्य पॉईंट चार टक्क्यावरुन दोन टक्के केला.

म्हणजेच 100 कोटी रुपयांच्या होमलोनवर बँकेला 2 कोटी रुपये स्वत: जवळ ठेवावे लागतील. ग्राहकांना घराच्या किंमतीच्या 80 टक्केच कर्ज मिळेल.

रिझर्व्ह बँकेच्या या पाऊलामुळे बँकेला कर्ज देण्यावर मर्यादा पडतील. म्हणजेच आता ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये जागेच्या किंमती गगनाला भिडतायेत. त्यामुळे या वाढत्या किंमतींना लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 75 लाखांपेक्षा जास्त कर्जावरील रिस्क वेटेज 125 टक्के करण्यात आले आहे.

याचा फटका लक्झुरी घर खरेदी करण्यार्‍या ग्राहकांना बसणार आहे. कारण 75 लाखांपेक्षा जास्त होमलोन देण्यासाठी जास्त पैसे बाजूला ठेवावे लागतील. कर्ज महागले तर जागेच्या किंमतीही कमी होतील असे डेव्हलपर्सचे म्हणणे आहे.

रिझर्व्ह बँकेने याआधीही व्याजदरात सहावेळा वाढ केली. मात्र त्याचा फायदा होमलोन घेणार्‍या ग्राहकांना फारसा झाला नाही. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहुर्तावर घर खरेदी करण्यार्‍या ग्राहकांना फटका बसणार आहे.

close