ट्रॅफिक हवालद ऐतवडेकरांचा दुदैर्वी अंत

November 3, 2010 8:24 AM0 commentsViews: 3

03 नोव्हेंबर

वसईतल्या ट्रॅफिक पोलिस अनिल ऐेतवडेकर यांचा दुदैर्वी अंत झाला आहे. भायखळ्याच्या मसिना हॉस्पिटलमध्ये ऐतवडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. 27 ऑक्टोबरला वसई रेल्वे स्टेशनच्या रिक्षा स्टँडवर ऑटोचालक महेंद्र केवड याने ट्राफीक पोलिस ऐतवडेकर यांना भर रस्त्यात पेटवून दिले होते.

त्यानंतर सात दिवस ते मृत्युशी झुंज देत होते. केवड याच्याकडे रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र नव्हती. या कारणावरुन ऐतवडेकर आणि केवड यांच्यात वाद झाला होता.

या वादातून केवड यानं ऐतवडेकर यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले होते. वसई रेल्वे स्टेशनच्या रिक्षा स्टँडवर रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली होती. यात ऐतवडेकर 45 ते 50 टक्के भाजले होते.

दरम्यान, रिक्षाचालक महेंद्र केवड पोलिसांच्या ताब्यात आहे. महेंद्र केवडवर याआधी बलात्कार आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

close