महिला सुरक्षा विधेयकाला मंजुरी

November 4, 2010 10:47 AM0 commentsViews: 5

04 नोव्हेंबर

महिला सुरक्षा विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. नोकरीच्या ठिकाणी होणार्‍या अत्याचारांविरुध्द महिलांना आता तक्रार करता येणार आहे.

हे विधेयक समंत झाल्यानंतर आता पीडीत महिला दोषींना कोर्टात खेचू शकतील. या विधेयकामुळे संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना लैंगिकअत्याचार विरोधात तक्रार करायला मंच उपलब्ध होईल.

यामध्ये कामकाजाच्या जागेवर शारीरीक सुखाची मागणी करणे, लैंगिक सूचक टिपण्णी करणे, अश्लील चित्रफीती दाखवणे अशा प्रकाराविरुध्द दाद मागू शकतात.

close