बारामतीत चिंकाराची शिकार

November 4, 2010 11:48 AM0 commentsViews: 7

04 नोव्हेंबर

बारामती तालुक्यातील सस्तेवाडी वनक्षेत्रात चिंकाराची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून एक बंदूक आणि चिंकाराची शिंग जप्त करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यापूर्वी बारामती तालुक्यातील चौधरवाडी इथल्या जंगलात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शिकार प्रकरण चांगलेच गाजले होते.

close