काश्मिर प्रश्नी तोडगा लादू शकत नाही -ओबामा

November 8, 2010 9:43 AM0 commentsViews: 2

8 नोव्हेंबर

नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये आज भारत अमेरिकेत मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांच्यादरम्यान द्विपक्षीय बैठक पार पडली.

या बैठकीत काश्मिरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्ताने एकत्रितपणे प्रयत्न काम करायला हवेत, अमेरिका त्यासाठी मदत करेल, पण तोडगा लादू शकत नाही, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.

तर पाकिस्तानशी चर्चा करायला भारत तयार आहे पण पाकने दुटप्पी भूमिका सोडावी असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला.

नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये आज भारत अमेरिकेत मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांच्यादरम्यान द्विपक्षीय बैठक पार पडली. 10 वाजून 50 मिनीटांनी दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक सुरु झाली.

यात अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो पाकिस्तान. त्याचबरोबर चीन, अफगाणिस्तान आणि इराणच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

पाकिस्तानशी चर्चा करताना भारताला येणार्‍या समस्या पंतप्रधानांनी ओबामांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजत आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सरकार चर्चेसाठी तयार असले तरी लष्कर मात्र भारताबरोबर पाक सरकारला चर्चा करु देत नसल्याची खंत भारताने व्यक्त केली.

लष्कर ए तोएबासारख्या दहशतवादी संघटनांवरसुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारताला पाकिस्तानशी चर्चा करायची असून यासाठी कुरेशींना भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याचही मनमोहन सिंग यांनी ओबामांना स्पष्ट केले.

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बरोबरच परराष्ट्रीय सचिवसुध्दा बैठकीमध्ये सहभागी होते.

पाकिस्तानमधल्या दहशतवादावर अमेरिकेची भूमिका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याबाबत भूमिका आऊटसोर्सिंग पॉलिसीवर भारताला वाटणार्‍या चिंतेबाबत स्पष्टीकरणअणुभट्‌ट्यांसाठी चीन पाकिस्तानला करत असलेल्या मदतीवर वक्तव्यअफगाणिस्तानमध्ये भारताच्या वाढत्या महत्त्वाबाबत अमेरिकेचं मत

काश्मीरप्रश्नी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अमेरिकेची गरज- ओमर अब्दुल्ला

दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीबद्दल महत्वाची भूमिका मांडली आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेला मदत करायचीच असेल तर त्यांनी पाकिस्तानला भारताच्या नजरेतून काश्मीर पहायला मदत करावी, असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नी अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अमेरिकेची गरज आहे, मध्यस्थीसाठी नाही, असं ते म्हणाले.

भारताकडे पाहताना अमेरिकेने अफगणिस्तान-पाकिस्तान पॉलीसीच्या दृष्टीकोनातून बघू नये. भारत- अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये दहशतवाद आणि दहशतवादाचे स्रोत यावर भर असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली

द्विपक्षीय बैठकीपूर्वी सकाळी राष्ट्रपती भवनात स्वागत झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा राजघाटवर पोहचले. तिथं त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

महात्मा गांधींना ओबामा आपले आदर्श मानतात. गांधीजींच्या शांती, सत्य, अहिंसा, प्रेम या मुल्यांमुळे जगाला नवी दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया ओबामा यांनी राजघाट इथल्या पुस्तकात लिहिली.

बराक ओबामांनी लिहिलेली प्रतिक्रिया…

गांधीजींच्या शांती, सत्य ,अहिंसा, प्रेम या मुल्यांमुळे जगाला एक नवी दिशा मिळाली. या थोर नेत्याला आम्ही कधीही विसरु शकणार नाही.त्यांची मूल्य 60 वर्षानंतरही जगाला प्रेरणा देत आहेत – बराक ओबामा

close