नेमबाजांचे दिवाळी सेलिब्रेशन

November 3, 2010 2:24 PM0 commentsViews: 3

03 नोव्हेंबर

कॉमनवेल्थनंतर भारतीय ऍथलीट्सना आता वेध लागलेत एशियन गेम्सचे आणि एशियन गेम्ससाठी नेमबाजांचे सराव शिबीर सध्या पुण्यात सुरु आहे.

सगळीकडे दिवाळी साजरी होत असताना भारताच्या युवा नेमबाजांनी मात्र एशियन गेम्सवर लक्ष केंद्रीत केले आहे.

पण पुण्यातल्या लक्ष्य अकॅडमीने भारतीय नेमबाजांसाठी काल खास दिवाळी कार्यक्रम आयोजित केला होता.

दिवाळीचे निमित्त असले तरी या नेमबाजांचे कॉमनवेल्थमधले सुवर्णयश साजरे करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

राही सरनोबत, अनिसा सय्यद, गुरप्रीत सिंग, हीना संधू हे युवा नेमबाज कार्यक्रमाला हजर होते.

close