पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताकडे दुर्लक्ष

November 4, 2010 12:26 PM0 commentsViews: 2

04 नोव्हेंबर

लातूर जिल्ह्यातल्या हसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणाचा कळस बघायला मिळाला आहे. पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताचे चक्क कुत्र्यांनी लचके तोडले आहे.

हसेगावच्या अनाथ आश्रमातल्या पाचवीतल्या मुलीचा एच.आय.व्ही ने मृत्यु झाला होता. काल रात्रीपासून या मुलीचे प्रेत हॉस्पिटल प्रशासनाने उघड्यावर ठेवल होते.

रात्रीच त्यांनी पोस्टमॉर्टम करायला हवे होते. तरी डॉक्टरांनी प्रेत तसेच आरोग्य केंद्रात ठेवून घरी गेले. हा भयानक प्रकार घडल्यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सकाळी उशिरा पर्यंत पोहोचले नव्हते.

आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सध्या हसेगावमध्ये या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

close