ओबामांच्या सुरक्षेसाठी ससून डॉक बंद

November 4, 2010 12:29 PM0 commentsViews: 8

04 नोव्हेंबर

ओबामांच्या मुंबई भेटीमुळे मुंबईकरांच्या आनंदावर काहीसं विरजण पडणार आहे. कारण मुंबईकर पुढचे तीन दिवस माशांना मुकणार आहेत.

ओबामांच्या सुरक्षेसाठी ससून डॉक बंद राहणार आहे. बॉम्बे पोर्ट ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.

पण हा निर्णय अचानक लादल्याने मच्छिमारांचे नुकसान होणार आहे. किमान पूर्वसूचना गरजेची होती असं मच्छिमारांचे म्हणणे आहे.

मुंबई, ठाणे, रायगड परिसरातून दररोज 200 ट्रॉलर ससून डॉकला येत असतात. पण या तीन दिवसात एकही ट्रॅलर ससून डॉकला येऊ शकणार नाही.खोल समुद्रातच हे ट्रॅलर थांबवले जातील.

close