बैलगाड्यांच्या शर्यतीतून बैलांचा सुटका

November 8, 2010 10:34 AM0 commentsViews: 80

8 नोव्हेंबर

सांगली जिल्ह्यातल्या करगणी गावात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांचा अमानुष छळ करण्यात आला.

शर्यतीत सहभागी बैल गतीने पळावेत यासाठी यावेळी या मुक्या जनावरांना वीजेचा शॉक देण्यात आला.

ही दुदैर्वी घटना समजल्यानंतर प्राणी मित्र संघटनेने या बैलांची सुटका केली. तर आयोजकांनी याबाबत मौन बाळगले आहे.

close