विश्वनाथन आनंद विश्वविजेता झाला

October 29, 2008 5:50 PM0 commentsViews: 5

29 ऑक्टोबर भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद चेसचा वर्ल्ड चॅम्पियन झालाय. व्लादिमिर क्रामनिकविरुध्दचा अकरावा डाव ड्रॉ करीत त्यांन हे विश्वविजेतेपद पटकावलं. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी दोघांमध्ये एकूण बारा डाव खेळवण्यात येणार होते. पण अकराव्या डावातचं आनंदनं विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. आनंदनंअकरा डावतून साडे सहा पॉइंट्सची कमाई केली.तर त्याचा प्रतिस्पर्धी क्रामनिकला फक्त साडेचार पाँईटस पर्यंतच मजल मारता आली. व्लादिमिर क्रामनिकचा पराभव करत आनंदनं दुस-यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. आनंदनं भारतीय चेसला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. त्याच्या यशानं दोन पिढ्या प्रेरित झाल्या आहेत.

close