मुंबई हे देशाच्या सामर्थ्याचं प्रतीक – ओबामा

November 6, 2010 11:37 AM0 commentsViews: 7

9 नोव्हेंबर, मुंबई

दहशतवादाला उत्तर देण्यासाठीच हॉटेल ताजमध्ये आपण मुक्काम केला. तसंच मुंबई हे देशाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे अशा शब्दात भारत दौ-यावर आलेल्या बराक ओबामांनी मुंबईचं कौतुक केलंय.

आपल्या तीन दिवसांच्या भारत दौ-याची सुरुवात ओबामा यांनी मुंबई भेटीपासून केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हॉटेल ताजमध्ये 26/11 च्या हल्ल्यामधील शहिदांच्या कुटुंबियांना भेटले. त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी ताजमध्ये भाषण केलं. आपल्या भाषणात ओबामांनी मुंबईकरांच्या स्पिरीटला सलाम केलाय. 26/11 च्या हल्ल्यानंतर लगेच दुस-या दिवशी मुंबईकरांचा दिनक्रम सुरू झाला होता. मुंबई भारताच्या उर्जेचं प्रतीक आहे, असं ते म्हणालेत. भारतात येणं हा सन्मान आहे. पण ताजमध्ये येणं हा दहशतवाद्यांसाठी संदेश आहे, असं त्यांनी सांगितलं.मुंबईमध्ये सर्व धर्मांचे लोक एकत्र राहतात आणि प्रत्येक संकटांना एकत्र सामोरं जातात याचंही त्यांनी कौतुक केलं. हॉटेल ताजमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबामांचं स्वागत केलं. 26/11ला घडलेला प्रकार हा नेहमी स्मरणात राहील पण ते केवळ घडलेल्या प्रकारातील दु:खासाठी नाही तर त्यावेळी दाखवलेलं धैर्य आणि मानवतेसाठीही स्मरणात राहील. अशी नोंद ओबामांनी यावेळी ताजच्या रजिस्टर डायरीमध्ये केली.

close