मुख्यमंत्रीपदासाठी आपलंही नाव चर्चेत- प्रतीक पाटील

November 8, 2010 10:41 AM0 commentsViews: 43

8 नोव्हेंबर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक यांच्याबरोबर आपलंही नाव चर्चेत आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केला आहे. सांगलीत एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.

सध्या आपल्याला मुख्यमंत्रीपदाची गडबड नसली तरी, जबाबदारी टाकली तर नक्कीच मुख्यमंत्रीपद स्वीकारीन असं पाटील यांनी सांगितले.

तसेच अशोक चव्हाणांना तडकाफडकी बदलण्याऐवजी, याप्रकरणी सखोल चौकशी करून मगच निर्णय घ्यावा,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

close