ओबामा सुस्वागतम् !

November 6, 2010 8:32 AM0 commentsViews: 4

6 नोव्हेंबर, मुंबई

मुंबई एअरपोर्टवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ओबामांचं स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ओबामांना महाराष्ट्र दर्शन हे पुस्तक भेट दिलं. व्हाईट हाऊसमध्ये महाराष्ट्राची आठवण राहावी, या हेतूनं हे पुस्तक भेट दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं हॉटेल ताजमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केलं. या भेटीत त्यांनी बराक ओबामांना महात्मा ज्योतीबा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक भेट दिलं. ओबामांशी बोलल्यावर भुजबळांची अमेरिक दुतावासावरील नाराजीही दूर झाली.

close