तोडणीआधी ऊसाचा भाव जाहीर करावा

November 8, 2010 12:02 PM0 commentsViews: 6

8 नोव्हेंबर

ऊसाच्या गाळप हंगामाला सुरवात झाली आहे. पण ऊसाचा दर जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत ऊस तोडु देणार नाही अशी भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे.

आज कोल्हापूर जिल्ह्यातील माजगांव फाट्याजवळ कारखान्याकडे जाणारा ऊस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला.

साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर करावा मगच ऊस जावु देणार अशी भुमीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेने घेतली.

अनेक साखर कारखान्यानी संघटनेची तीव्र भुमीका पाहुन उसाचा दर जाहीर केला.

close