मी हाय कोळी… ओबामा-मिशेलनी धरला ठेका

November 7, 2010 9:54 AM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर, मुंबई

भारतभेटीवर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा मुंबईतला दुसरा दिवस सुरु झाला तो कुलाब्यातल्या शाळेला भेट देऊन. यावेळी ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी विद्यार्थ्यांच्या कोळी नृत्यात सहभागी होऊन सगळ्यांना सुखद धक्का दिला.

मुंबईतल्या होली नेम हायस्कूलला बराक ओबामांनी भेट दिली. या शाळेत ते पाऊण तास होते. त्यावेळी 50 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. तसंच विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. मी हाय कोळी या कोळीगीतावर तर ओबामा आणि मिशेल यांनी ठेका धरला. यावेळी त्यांनी इको फ्रेंडली सायन्स प्रदर्शनही बघितलं. यात ग्लोबल वॉर्मिगमुऴे करपून गेलेली पृथ्वी आणि मॉडर्न इको फ्रेंडली व्हिलेजचा समावेश आहे. हा संपूर्ण कार्यक्रम शाळेतल्या 8 / C च्या वर्गात झाला.

close