हुंडाविरोधी कायदा अधिक सक्षम करा-सुप्रीम कोर्ट

November 8, 2010 1:42 PM0 commentsViews: 15

8 नोव्हेंबर

देशात हुंडाबळींची संख्या वाढत असताना आता सुप्रीम कोर्टाने या संदर्भातली शिक्षा वाढवण्यासाठी केंद्राला सूचना केली. सरकारने हुंडाविरोधी कायदा करण्याची सूचना कोर्टाने केंद्रीय कायदे सचिवांना केली.

कलम 304 मधली शिक्षेची तरतूद अधिक कडक करावी अशी सूचना कोर्टाने केली. हुंड्यासाठी बळी घेणार्‍यांना फक्त सात वर्ष किंवा जन्मठेपेचीच शिक्षा का असा प्रश्नही कोर्टाने केला.

फाशीची शिक्षा का देऊ नये, हुंडाबळी साठी स्वतंत्र कायदा, सर्वंकष कायदा का करु नये, अशी विचारणा कोर्टाने केली आहे. शिक्षा कडक केल्यास या गुन्ह्यांचे प्रमाण घटेल.

close