हुमायूनच्या ऐतिहासिक कबरीला ओबामांनी दिली भेट

November 7, 2010 1:17 PM0 commentsViews: 1

7 नोव्हेंबर, मुंबई

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं रविवारी दुपारी दिल्लीत आगमन झालं. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी भारताचा ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा सांगणा-या 450 वर्ष जुन्या मुघल सम्राट हुमायूनच्या कबरीला भेट दिली.

ओबामा यांनी दिल्ली दौ-याची सुरुवात हूमायूनच्या ऐतिहासिक कबरीला भेट देवून केली. त्यांच्यासोबत यावेळी मिशेल ओबामाही होत्या. 450 वर्षे जुनी ही कबर आहे. ताज निर्माण करण्याची स्फुर्ती या मकब-याच्या निर्मीतीनंतर आली होती अस म्हटलं जातं. या कबरीला भेट देणारे ओबामा पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. प्रवेश केल्यानंतर 'वंडरफूल' असे उद्गार ओबामा यांच्याकडून निघाले. ASI चे पुरातत्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी ओबामा आणि लेडी ओबामा यांना मकब-याचा इतिहास समजावून सांगितला. मिशेल ओबामा यांनी या मकब-याविषयी अनेक प्रश्न केले. या मकब-यासाठी काम करणा-या कर्मचा-यांच्या मुलांसोबत ओबामा आणि मिशेल यांनी संवाद साधला. 4 ते 10 वर्षे वयोगटातील ही मुलं होती. मिशेल ओबामा यांनी त्यांना भेटवस्तूही दिल्या. या ठिकाणी ओबामा पती-पत्नी तब्बल 40 मिनिटे होते.

close