स्वत: येऊन काम करणार- राज ठाकरे

November 8, 2010 2:52 PM0 commentsViews: 4

8 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी बाकांवर बसणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. यासंदर्भात राज ठाकरेंनी कल्याण इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

तर महापौरपदाच्या मतदानात मनसे भाग घेणार नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केली. मनसेची सत्ता आली नसली तरी वचन दिल्यापप्रमाणे स्वत: येऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही मनसेने धक्का दिल्याचा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला.

close