कोल्हापूरात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

November 8, 2010 1:41 PM0 commentsViews: 2

8 नोव्हेंबर

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका तसेच कोल्हापूर महानगर पालिकेसंदर्भात रणनिती आणि धोरण ठरवण्यासाठी काँग्रेसची टिळकभवन येथे आज बैठक पार पडली.

नांदेड आणि नाशिक विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावही या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बंटी पाटील हे हजर आहे.

कडोंमपा महापौरपदासाठी अपक्षला पाठिंबा

या बैठकीनंतर कडोंमपा महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

आघाडीच्या नेत्यांचा तसा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

close