नेते आणि अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी – वाय.पी.सिंग

November 9, 2010 12:39 PM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर कारवाई झाली पण आदर्श घोटाळ्या प्रकरणात आणखी एक मुख्य व्यक्ती म्हणजे सरकारी अधिकारी रामानंद तिवारी आहे असं वाय.पी.सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

आदर्श घोटाळ्याची सुरुवात सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्रिपदावर असताना झाली.

अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चे प्रिन्सिपल सेक्रेटरी या पदावर असणार्‍या रामानंद तिवारी यांनी सुशिलकुमार शिंदेंसमोर आदर्शसंबंधी एक प्रस्ताव मांडला आणि हा खेळ सुरू झाला.

त्यामुळे या प्रकरणात समावेश असणारे इतर नेते आणि अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी वाय.पी.सिंग यांनी यावेळी केली.

close