नवी मुंबई विमानतळाला परवानगी मिळणार

November 9, 2010 1:27 PM0 commentsViews: 3

09 नोव्हेंबर

गेले अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाला येत्या दोन ते तीन दिवसात परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या उच्च स्तरीय समतीने आज प्रस्तावीत नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेतला.

पर्यावरण हानी होवू नये यासाठी सिडकोने सूचवलेल्या उपाययोजनांचा आढावा समितीने घेतला.

आणि त्यानंतरच यासंदर्भातले संकेत मिळाले आहेत. 2007 ला केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रकल्पाला मंजूरी दिली होती.

मात्र पर्यावरण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयातील वादामुळे हा प्रकल्प रखडला होता.

close