नव्या मंत्रीमंडळाची रचना लवकरच – मुख्यमंत्री

November 13, 2010 9:52 AM0 commentsViews: 9

13 नोव्हेंबर

नव्या मंत्रीमंडळाची स्थापना करतांना सामाजिक समतोल राखला जाईल अशी माहिती नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते आज दिल्लीत बोलत होते.तसेच नवे मंत्रीमंडळ स्थापन करतांना भ्रष्टमंत्र्यांना दूर ठेवण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले.

मंत्रीमंडळाच्या रचनेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या दिल्लीत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली.

त्याअगोदर त्यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी ते मंत्रीमंडळाच्या रचनेबाबत चर्चा करणार आहेत. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले काँग्रेस नेते आणि आमदारही दिल्लीत दाखल झाले आहेत.

आपल्या गॉडफादर मार्फत वर्णी लावण्यासाठी त्यांचही जोरदार लॉबिंग सुरू आहे. चांगले काम करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने अनेक ज्येष्ठ नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

close