न्यूझीलंडची 350 धावांवर मजल

November 13, 2010 10:36 AM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर

हैद्राबाद टेस्टमध्ये न्यूझीलंडची पहिली इनिंग 350 रन्समध्ये गुंडाळण्यात भारतीय बॉलर्सना यश मिळाले आहे.

आज दुसर्‍या दिवशी न्यूझीलंडच्या बॅट्समननी कालच्या स्कोअरमध्ये फक्त 92 रन्सची भर घातली.

सकाळी झहीर खाने हॉपकिन्स आणि विल्यमसनच्या महत्त्वाच्या विकेट पहिल्या अर्ध्या तासातच मिळवल्या. आणि भारताचं काम सोप केले.

त्यानंतर हरभजनने मग शेपूट गुंडाळले. जेसी रायडरच्या 70 रन्समुळे न्यूझीलंडने निदान 350 रन्सची मजल मारली.

भारतातर्फे झहीर आणि हरभजनने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. भारताची इनिंग आता सुरु झाली आहे.

close