एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात गोल्ड

November 13, 2010 10:43 AM0 commentsViews: 6

13 नोव्हेंबर

एशियन गेम्स दिमाखदार सोहळ्यानतंर आज खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने पहिलं गोल्ड मेडल पटकावलंय ते वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात भारताच्या श्रीनिवास बल्लुरीने गोल्ड तर सुखेन डेने सिल्व्हर मिळवले.

श्रीनिवासने 245 किलो वजन उचलले. तर सुखेनने एकूण 230 किलो वजन उचलत दुसरा क्रमांक पटकावला.

पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्टल आणि महिलांच्या दहा मीटर एअर रायफल टीम प्रकारात भारताचा पराभव झाला. पिस्टल प्रकारात भारतीय टीमला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तर एअर रायफल प्रकारात महिलांची टीम सातव्या क्रमांकावर फेकली गेली. ओंकार सिंग, अमनप्रीत सिंग आणि दीपक शर्मा यांच्या टीमने 1646 पॉइंट्सची कमाई केली.

पण गोल्ड पटकावणार्‍या कोरियन टीमपेक्षा ते तीस पॉइंट्सनी मागे होते. तर सुमा शिरुर, कविता यादव आणि तेजस्विनी सावंत या महिलांच्या टीमनेही दहा मीटर एअर रायफल प्रकारात निराशा केली.

त्यांनी दोन हजार पैकी 1176 पॉइंट्स मिळवले. दहा मीटर सिंगल्समध्ये तर एकही भारतीय महिला फायनलसाठी पात्र ठरली नाही. पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्टलच्या सिंगल्समध्ये मात्र ओंकार सिंगने फायनल गाठली.

पण फायनलमध्ये त्यालाही सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

close