मुंबईत आणखी एक गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

October 30, 2008 11:07 AM0 commentsViews: 12

30 ऑक्टोबर, मुंबईरोहिणी गोसावीमुंबईतल्या एलफिन्स्टन रोड स्टेशनजवळ प्राइम प्लाझा सोसायटीत एका गोदामाला बुधवारी रात्री आग लागली. उज्ज्वल अ‍ॅपरल्स असं गोदामाचं नाव आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाचे 10 बंब रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तसंच किती रुपयांचं नुकसान झालं, हेही अद्याप समजू शकलेलं नाही. इमारतीत वेगवेगळ्या कंपन्यांची गोदामं आहेत. आगीचं कारण अजुनही समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील एका गोदामाला आग लागली होती.

close