पुण्यात दिव्यांचे अनोख प्रदर्शन

November 13, 2010 8:20 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर

जीवन प्रकाशमान करणार्‍या देशी आणि विदेशी दिव्यांचे अनोख प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आले आहे.

तब्बल साडे तीनशे दिव्यांचा समावेश असणार्‍या या प्रदर्शनाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनात शिवकालीन ,ब्रिटीश कालीन, तसच हिंदु-इस्लामीक, ख्रिस्चन धर्माची संस्कृती घडवणार्‍या दिव्यांचाही समावेश आहे.

प्रा. श्याम जोशी यांनी गेली 40वर्ष मेहनत घेवून या दुर्मिळ दिव्यांचा संग्रह केला.

1200 वर्षापूवीर्ंच्या अतिशय प्राचीन दिव्यांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे.

पुण्यातल्या संस्कार भारती या संस्थेतर्फे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

पुण्यातल्या रमनबागच्या न्यू इंग्लीश स्कुलमध्ये भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन पुढचे दोन दिवस पाहता येणार आहे.

close