आँग सान सू की यांची अखेर सुटका

November 13, 2010 1:32 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांची अखेर आज सुटका झाली.

म्यानमारच्या लष्करी राजवटीनं तब्बल पंधरा वर्षांनंतर त्यांची नजरकैदेतून सुटका केली.

त्यांच्या स्वागतासाठी तब्बल दहा हजार कार्यकर्ते यावेळी सू की यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते.

स्यू की यांच्या सुटकेमुळे नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सुटका झाल्यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर स्यू की यांनी भाषण केले. उद्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

close