शहीदांना सलाम देण्यास सायकल यात्रा

November 13, 2010 2:02 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

मुंबईतल्या 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या कुटुंबियांनी शहीदांना सलाम करण्यासाठी दिल्ली ते मुंबई सायकल यात्रा सुरू केली.

ही यात्रा जळगावला दाखल होताच जळगावकरांनी उन्नीकृष्णन कुटुंबीयांचे उस्फूर्त स्वागत केले.

26 ऑक्टोबरला दिल्लीच्या इंडिया गेटपासून निघालेला उन्नीकृष्णन परिवार 26 नोव्हेंबरला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला पोहोचणार आहे.

या प्रवासात ठिकठिकाणी शहीद कुटुंबियांची ते भेट घेत आहेत. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन यांचाही संदेश हा परिवार देत आहे. सलग दोन दिवस के उन्नीकृष्णन जळगांव जिल्ह्यांत अनेकांना भेटणार आहेत.

आयुष्याच्या उतारवयांत आणि उमद्या मुलाच्या जाण्यानं झालेल्या दुखात जगण्यापेक्षा लोकांमधे जागृती निर्माण करण्यासाठी जगायचे त्यांनी ठरवले.

या पूर्ण प्रवासात त्यांना त्यांची पत्नी धनलक्ष्मी आणि मित्र हिरालाल यादवने साथ दिली आहे.

close