सर्पमित्राचं अनोख्या पध्दतीने लग्न

November 13, 2010 2:42 PM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर

बीड जिल्ह्यातल्या सौताडा येथील सर्पमित्र सिध्दार्थ सोनावणे यांनी वन्यजीव रक्षणासाठी अनोख्या पध्दतीने लग्न केले.

मंगल कार्यालयात लग्न न करता चक्क त्याने निसर्गाच्या सान्निध्यात लग्न केले. त्यांनी फुलांचे हार घालण्याऐवजी सापाचा हार घालून लग्न केले.

आणि शेतकर्‍यांचा मित्र समजल्या जाणार्‍या सापाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. अजगराची वरमाला त्यांनी वधूच्या गळ्यात घातली.

तर वधूनंही वराच्या गळ्यात धामण जातीच्या सापाची वरमाला घातली. या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलिसांसह समाजातले अनेक लोक उपस्थित होते.

close