नांदेड विधान परिषदेच्या जागा बिनविरोध

November 13, 2010 2:54 PM0 commentsViews: 5

13 नोव्हेंबर

नांदेड विधानपरिषदेची निवडणुकीत काँग्रेसचे अमर राजूरकर निवडून आले.

ही निवडणुक बिनविरोध झाली. त्यांच्याविरुद्ध माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे आबा वानखेडे आणि भाजपचे संभाजी पवार यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळं इथली निवडणुक बिनविरोध होऊन काँग्रेसचे अमर राजूरकर निवडून आले.

पुणे आणि सातारा-सांगली विधानपरिषदेवर राष्ट्रवादी

तर पुणे आणि सांगली-सातारा विधानपरिषदेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली. पुणे आणि सांगली-सातारा विधानपरिषदेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत.

दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. पुण्यात भाजपच्या चंद्रशेखर भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले बिनविरोध निवडून आले.

तर सातारा-सांगली विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर घार्गे हे निवडून आले आहेत.

close