मी नाराज नाही – छगन भुजबळ

November 13, 2010 3:14 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

माझं उमुख्यमंत्रीपद गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज होणं स्वाभाविक आहे. पण मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

आज त्यांनी पुण्यातल्या महात्मा फुले वाड्याला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शरद पवारांशी माझी गाठभेट नाही.

तसेच मी पदासाठी कुठलीही तडजोड करणार नाही आणि पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री पदापेक्षा दुसर काही बार्गेनिंग काय असत, असा ख़डा सवालही त्यांनी केला.

त्याचबरोबर केंद्रात जाणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रात सध्या जागा शिल्लक नाही, त्यामुळे केंद्रात जाण्याचा प्रश्नच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

close